शब्दांचा मेळ
विचारांचा घोळ
डोक्यातले विचार
शब्दसंचाचे आचार म्हणजे कविता
गुंतागुंतीच्या आठवणी
सुखदु:खाच्या साठवणी
मित्रमैत्रीणींचा आधार
मैफिलींचा खुमार म्हणजे कविता
बाबांचा धाक
मायेची हाक
बहिणींची माया
वडीलधा-यांची छाया म्हणजे कविता
रेशमाचा धागा
हृदयातील जागा
लहानसहान रुसवे फुगवे
खूप सारे हसणे म्हणजे कविता
शेवटी कविता कविता म्हणजे काय हो
चार ओळीचे चार कडवे
चार डोळ्यातील चार आसवे
दोन हृदयाची एक धक धक
प्रेमात पडलेल्यांची नुसती बक बक म्हणजे कविता...