Thursday, 22 January 2015

अखेरचे काही शब्द ,फक्त तुझ्यासाठी

अखेरची आठवण घे
यापुढे मनात तुझ्या
माझ येणे जाणे असणार नाही...

यापुढे माझ्या आठवणींचं चांदणं
तुझ्या मनात बरसणार नाही.....

यापुढे कधीही माझ्या आठवणींचा पाऊस
तुझ्या मनाच्या अंगणात बेधुंद बरसनार नाही....!

माझा हळवेपना मीठीतला प्रेमळ आपलेपणा
जसा स्वीकारला होता
तसच माझ मरणही स्विकारुन घे...!

हे अखेरचे माझे  काही अश्रू,
फक्त तुझ्यासाठी...
पण यापुढे माझ्या आसवांच्या धारा
वाहणार नाहीत...

काही करु नको
उग रडू नको
होती एक वेडी
वेड तिच प्रेम
वाटल तर आठवनीत ठेव
नाही तर अस्थि सोबत वाहून
जाऊ दे

या जन्मी तरी सुख प्रेम नाही भेटल
कदाचित पुढच्या जन्मी
तरी थोड़ प्रेम थोड़ सुख मिळेल
म्हणुन मला जाऊ दे ।

अखेरचे काही शब्द ,फक्त तुझ्यासाठी...
यापुढे मी कधी तुझी कुशी मागणार नाही .........!
कारण अखेरची शांत कुस
माय माउली धरणी माता
मला कुशीत सामावून घेईल ।।।