Wednesday, 4 February 2015

अचानक

अचानक भेटली तु,
अचानक प्रेम जडले...
अचानक बोलली तु,
अचानक प्राण गहिवरले...
अचानक हसलीस तु,
अचानक फुल उमलले...
अचानक पाहिले तु,
अचानक नजारे उमटले...
अचानक साद दिला तु,
शब्द माझे अवघड झाले...
अचानक स्पर्श केलास तु,
अचानक शहारे उठले...
अचानक घडले सारे,
जिवन पुन्हा जन्मास आले...
अचानक.. अचानक... अचानक...