Friday, 13 March 2015

असेल तर गमवायला घाबरतो...


ज्या बद्दल विचार करतो
ज्या बद्दल स्वप्न पहातो........
ज्याचे गाणे आनंदाने गातो
ज्यामुळे सुखाची झोप घालवतो...
सारे सुख त्यासाठी त्यागतो .........
नसेल तर त्याचा शोध घेते ...
असेल तर गमवायला घाबरतो...
त्या आधारे सारे जीवन जगून जातो .....
निरपेक्षपणे मिळावे हेचं मागंणे मागतो
जेव्हा गवसते काय करावे समजत नाही
त्या शिवाय दुसरे काही सुचतचं नाही
शब्द अगदी छोटा पण त्याची व्याप्ती उमगत नाही
सांगायचा प्रयत्न केल्यास सांगणे जमत नाही ......
शब्दात व्यक्त करणे अशक्य .......
त्या शिवाय जगणे कधी न शक्य .....
पहा कुठेही चराचरात दिसते
मनात अंतरी खोलवर वसते .....
असे काय आहे हे का विचारतात
अरे कदाचित ह्या सार्‍याला ' प्रेम ' म्हणतात.....

No comments:

Post a Comment