Thursday, 30 April 2015

मला आवडतं तुझ्यात हरवणं

मला आवडतं पिल्लू   तुझ्यात हरवणं...
मला आवडतं,
तुझं तासनतास बोलणं.
तुझ्या त्या गप्पांमध्ये,
तुझ्या डोळ्यात हरवणं.

मला आवडतं,
तुझं पावसात भिजणं.
हातातली छत्री टाकून,
तुझं प्रत्येक थेंबाला बिलगणं.

मला आवडतं,
तुझं माझ्यावर रुसणं.
पण कान पकडून उठाबशा काढल्यावर,
लगेच चेहर्‍यावर हसू उमटणं.

मला आवडतं,
समुद्रकिनारी तुझ्यासवे हिंडणं.
तुझा हात हाती घेऊन,
त्या वाळूत अनवाणी चालणं.
  
मला आवडतं,
तुला मिठीत घेणं,
मग मुद्दाम काही बहाणा करून,
तुझं मला दूर लोटणं.

मला आवडतं,
तुझ्यासवे रात्री गच्चीवर बसणं.
चांदण्या मोजता मोजता,
हळूच तुझ्या कुशीत शिरणं.

मला आवडतं,
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी वेचणं.
अगं खरच सांगतोय,
मला आवडतं फ्क्त. पिल्लू  तुझ्यात हरवणं,
तुझ्यात हरवणं तुझ्यात हरवणं.....

No comments:

Post a Comment