तू नाही समजलीस गं माझे केवढे प्रेम आहे तुझ्यावर फक्त रागवत गेलीस अन लाथाळलेस तू माझ्या हृदयाला समजून तरी घ्याचेस माझा जीव तुझ्यासाठी तुटतो नाही समजलीस ना तुझ्यासाठी जगलेल्या त्या रात्रींना माझे प्रेम तसेच आहे गं तुला समजावू नाही मी शकलो तुला ओळखता हि आले नाही अन मी तुला गमावून बसलो समजली नाहीस तू माझे खूप प्रेम होते तुझ्यावर ... माझे खूप प्रेम होते तुझ्यावर...
Friday, 15 May 2015
तुझ्याविना... … जग माझे सुने सुने बघ
तुझ्याविना... … जग माझे सुने सुने बघ!
झाले तुझ्याविना जीव रमवावा कसा मन कुठेही लागेना II
दुःख, वेदनांचे घन बरसले माझ्यावर आशा सागरी बुडाली, आला अश्रुनाही पुर सख्या!
जावू नको दूर मज पोहता येईना.....II क्षण क्षण आनंदाचा तुझ्याविना दुखी आहे प्रेमजलाची सरिता दुःख सागरात वाहे गंध नसताना तुझा आज वाराही वाहेना.....II
तुझ्याविना जगी मला आज एकटेसे वाटे दाहिदिशांचा कालोख माझ्या जीवनात दाटे जगु कुणासाठी आता? तुझी साथ नसताना.....II
लागे तुझीच चाहुल जिथे तिथे क्षणोक्षणी साद घालता मी तुला भीने वारा पानोपानी दिसे तुझीच प्रतिमा जिथे तिथे पाहताना ....
Sunday, 10 May 2015
आज तुला मी नकोय
आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत..
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत..
तुझ्या वागन्यातुन समजत होत दुसरीकडे ओढ़ लागलेल.
तुझ मन.. मला समजुन येत होत.
.खुप वाईट वाटत होत पण काहीच सुचत नव्हत..
दिवसातून हजारो मेसेज करणारी तू पण आता सगळ बंद होत..
खुप आठवन येते,हेंम्बाड थूथराचा पागल नको करू अस बोलन आता संपून गेल होत..
हे अचानक अस होइल अस कधीच वाटल नव्हत..
प्रत्येक मिनिटाला मोबाईल कड़े पहान आज ही तसच चालु होत.
. ये मूर्खा फोन करना तुझा आवाज ऐकायचाय अस बोलणार कोणच उरल नव्हत..
वरुण हसताना दिसलो तरी मन रडन सोडत नव्हत..
तुझ्या विरहात जगन खुप कठिन झाल होत..
देवा माझ्या स्वीट हर्ट ला उदंड आयूष्य दे एवढच मागण तुझ्या चरना जवळ होत.. . . . . . .
(काळजी घे मी कसाही जगेन पण तू सुखी रहा तिला एवढच सांगायच होत)...
मी जेव्हा मरेन तुझ्या डोळयांत
मी जेव्हा मरेन
तुझ्या डोळयांत
पाणी आणायचे नाही..
माझ्या नावाने ओरडायचे
नाही..
मला मिठीत घेऊन परत ये
ना
अजिबात म्हणायचे
नाही..
खुप वाट पाहीली गं
तुझ्या रिप्लायची..
मला पुन्हा आता झुरायचे
नाही..
फक्त एक फुल ठेव देहावर
माझ्या कारण....
हे फुल
मला जिवंतपणी मिळायचे
नाही..