Friday, 15 May 2015

तुझ्याविना... … जग माझे सुने सुने बघ

तुझ्याविना... … जग माझे सुने सुने बघ!

झाले तुझ्याविना जीव रमवावा कसा मन कुठेही लागेना II
दुःख, वेदनांचे घन बरसले माझ्यावर आशा सागरी बुडाली, आला अश्रुनाही पुर सख्या!
जावू नको दूर मज पोहता येईना.....II क्षण क्षण आनंदाचा तुझ्याविना दुखी आहे प्रेमजलाची सरिता दुःख सागरात वाहे गंध नसताना तुझा आज वाराही वाहेना.....II
        तुझ्याविना जगी मला आज एकटेसे वाटे दाहिदिशांचा कालोख माझ्या जीवनात दाटे जगु कुणासाठी आता? तुझी साथ नसताना.....II
लागे तुझीच चाहुल जिथे तिथे क्षणोक्षणी साद घालता मी तुला भीने वारा पानोपानी दिसे तुझीच प्रतिमा जिथे तिथे पाहताना ....

No comments:

Post a Comment