ते प्रेम होत कि मैत्री मला कधी कळलंच नाही तुझ्यावर रुसन फुगण न तू मला मनवण मग मी हसून तुझ्यावरचा राग विसरणं ते प्रेम होत कि मैत्री मला कधी कळलंच नाही तुला भेटायला ओढ लागण तुझ्याशी बोलाव वाटण न कधीतरी मीच तुझ्या गप्पांना कंटाळून निघून जाण ते प्रेम होत कि मैत्री मला कधी कळलंच नाही आज बसलेय मी एकटीच न कातरवेळ झालीय क्षितिजापर्यंत नजर जातीये न मन फक्त तुलाच शोधतय …… आज कळतंय रे मला कि ते प्रेमच होत .......... सुरुवात फक्त मैत्री ने झाली होती आज खोलवर मनात डोकून पाहिलं न जाणवलय खरंच ! ते प्रेम होत ........
No comments:
Post a Comment