स्वप्नी पाहिले तुला , अन् विचार आला माझ्या मना हे स्वप्न सत्यात साकारले तर ..... तू माझ्या आयुष्यात खरोखर आलीस तर ........... प्रश्नांच्या या वादळाने , घातले मनात थैमान स्वप्न आणि वास्तव याची उरली नाही जाण स्वप्नातच ठरवले होते , एक मेकांचे साथी आपण व्हायचे अन् एकमेकांच्या दुनियेत रंगून जायचे ....................... बोलता बोलता मी , माळले तुझ्या केसात गुलाबाचे फूल अन् तु ही फुलवून पाकळ्या ओठांच्या , आपल्या होकाराची पटवून दिलीस खूण ............... अचानक वर्षाराणीनेही केला होता , आपल्यावर तुषारांचा वर्षाव अन् कुठूनतरी ऐकू आली हाक बचाव बचाव ...................... वाटले जणू झोपेतच धरला माझा , कुणीतरी कान ...... पण हे स्वप्न नसून सत्य आहे , कळले आल्यावर भान.
No comments:
Post a Comment