Monday, 15 December 2014

कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर

कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर
एक चान्स दे मला तुझ्यासाठी करेल, जे केले नाही आजवर,
आंधळा झालोय तुझ्या प्रेमात मी कोणी सावरेल का मला,
स्वप्नात येते तू दिवस रात्रं याची चाहूल आहे का तुला,
तुझी आठवण येता चुकतो माझ्या हृदयाचा ठोका,
तुझ्या सुंदर डोळ्यांमध्ये बघण्याचा कधी सोडत नाही मोका,
असं वाटत कि तुझ्या सुंदर नयनांमध्ये स्वतःला विसरून जाऊ,
काळ्याभोर केसांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊ,
का, कसे, केव्हा सांगू मी किती प्रेम करतो तुझ्यावर
भीती वाटते कि,काय असेल तिचे उत्तर
असा विचार येतो माझ्या मनात,
असतील का तिला माझ्या बद्दल भावना
आणि विचारातच मी अडकून जातो
कधी पूर्ण होतील का माझ्या मनोकामना..
***N.S*****

No comments:

Post a Comment